सिडको : रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह हजारो धावपटूंनी यात सहभाग घेतला. विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. अश्विनीनगर येथील राजे संभाजी स्टेडियम येथे रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित दहावी मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मोठ्या उत्सवात पार पडली. या स्पर्धा १२ ते १४ , १५ ते १७ व १८ वर्षांपुढील मुले आणि मुलींमध्ये घेण्यात आल्या. यावेळी वेगवेगळ्या गटात विजयी झालेले तानाजी नर्मदे, सुरेश कोंडार, यशवंत पवार, शिवाजी सांडखोरे, किशोर मलकांब, गणपत मुठाळ, धोंडराम पारधी, सुरेश पालवी, कोंडाजी गुंबाडे, हरिश्चंद्र मंडलिक, प्रभाकर पारथी, हरिभाऊ थेटे, अनंत कसबे, दशरथ थेटे, हरी शेवरे, संतू लिलके, कल्लू लोटे, रामदास गायकावाड, मधुकर वाघ, निवृत्ती उंबाळे, पुंडलिक पारधी, लहानू कुंर्द, विठ्ठल लिलके, अशोक कुंभार, ब्रिजलाल गवळी, नवसू बेंडकोळी, वाळू लिलके, वसंत पिंपरुळे आदी विजेत्या धावपटंूना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, रवींद्र सपकाळ, हिरामण अहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास रोटरी क्लब, नाशिक अंबडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अजित भामरे, अध्यक्ष विपूल लोया, सचिव जयंत पवार, टी. एच. पाटील, संतोष भट्ट, दीपक तावडे, नितीन थोरात, भास्कर पवार, मेजर डी. के. झरेकर आदी सहभागी झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून या स्पर्धा सलग घेण्यात येत असून पहिल्या वर्षी लोकप्रिय धावपटू कविता राउत यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येतात. १०व्या मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक मुंढेगाव येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला. स्पर्धा पार पडल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मैदान तसेच परिसर स्वच्छ केला.- डॉ. अजित भामरे, संस्थापक अध्यक्ष, रोटरी क्लब
मिनी मॅरेथॉनमध्ये धावले हजारो धावपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:42 PM