लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्कृतीच्या वृद्धीसाठी प्रसिद्ध संगीतकार लेखक कवी स्व. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे यांना त्यांचे शतक महोत्सवी जन्मवर्षानिमित्त समर्पित म्हणून तपोवनातील स्वामीनारायण स्कूलसमोर असलेल्या लंडन पॅलेस येथे हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘जागवू या मुलांचा देशाभिमान गाऊन’ राष्ट्रभक्तीपर समूहगान करून राष्टÑभक्तीचा जागर केला.शुक्रवारी सकाळी ९ वाजता झालेल्या या सामूहिक देशाभिमान राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुरात देशभक्तीपर गीत राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर समूहगान कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्षे होते झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे संस्थापक नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, स्वामीनारायण शाळेचे स्वामी ज्ञानपुराणी महाराज, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महापौर रंजना भानसी, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, आयर्न गर्ल ऋतुजा सिंगल, नगरसेवक शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे, सचिन ढिकले गुलाब भोये, देवेंद्र पटेल, कांतीलाल जयस्वाल आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ‘भारत हमको प्यारा है’ झेंडा गीत, ‘तू नव्या जगाची आशा’ तसेच ‘यापुढे यशाकडे झेप घ्यायची’ असे सामूहिक समूहगान सादर केले यावेळी उद्देशिका वाचन करण्यात आले. पोलीस आयुक्त सिंघल यांनी राष्ट्र अभिमान जागविण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमांचे सादरीकरण करून राष्ट्रभिमान जागविला पाहिजे, असे सांगितले. ऋतुजा सिंगल यांनी मी जसे घडली तसे तुम्हीदेखील घडावे, उद्या तुम्ही मोठे झाले तर देश घडेल असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक गुरुमित बग्गा यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वामीनारायण शाळेच्या मुख्याध्यापक अस्मिता पटेल यांनी केले. कार्यक्रमाला नाशिक शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
११ हजार विद्यार्थ्यांच्या समूहगानाने राष्टभक्तीचा जागर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 6:47 PM
शुक्रवारी सकाळी ९ वाजता झालेल्या या सामूहिक देशाभिमान राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुरात देशभक्तीपर गीत राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर समूहगान कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्षे होते
ठळक मुद्देझेप मंडळाचा उपक्रम : शहरातील शाळांचा सहभाग‘भारत हमको प्यारा है’ झेंडा गीत, ‘तू नव्या जगाची आशा’