नाशिक : राष्टयीकृत बँक कर्मचाºयांना अवघ्या दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ तसेच अन्य विविध मागण्यांसाठी या बॅँकांमधील नऊ संघटनांनी युनायटेड फोरम बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दोनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. या कर्मचाºयांनी स्टेट बॅँकेच्या आग्रारोड शाखेसमोर निदर्शने केली. नाशिक जिल्ह्यातील सव्वाचारशे शाखांमधील व्यवहार बुधवारी (दि. ३०) पूर्णत: बंद होते. जिल्ह्यातील साडेतीन हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याने सेवा खंडित झाल्याने अनेकांना नेट बॅँकिंग, एटीमसारख्या साधनांचा वापर करावा लागला. या संपात सहभागी संघटनांनी एकत्रित येत नेहरू उद्यानासमोरील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेसमोर निदर्शने करत या अल्प वेतनवाढ कराराचा निषेध केला. एकीकडे सरकारवर कर्जाचा बोजा असताना केंद्रीय कर्मचाºयांना २८ टक्के वेतनवाढ दिली जाते; मात्र आज बँका या सरकारच्या विविध योजनांमध्ये सहयोग देत असताना कर्मचाºयांच्या वेतनवाढीची सांगड नफ्याशी जोडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.एटीएम सेवेवर परिणाम शक्यबँकांच्या संपामुळे आता नागरिकांची मदार एटीएमवर आहे. मात्र, एटीएममध्ये केवळ एक दिवसापुरतीच रोकड भरली जात असल्याने ही रक्कम संपल्यास एटीएममध्ये खडखडाट जाणवू शकतो. विशेषत: गुरुवारी (दि. ३१) बंदचा परिणाम जाणवू शकतो.
बॅँक कर्मचाऱ्यांच्या संपाने कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:05 AM