देवळाली कॅम्प : टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या आंतरराज्य भरतीप्रक्रियेत पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार तरुण मध्यरात्रीपासून देवळाली कॅम्पमध्ये आल्याने एकाचवेळी झालेल्या गर्दीमुळे लष्कर प्रशासनाने पहाटे तीन वाजेपासून भरतीप्रक्रियेला सुरुवात केली. भरतीदरम्यान गर्दीतील रेटारेटीत काही तरुण पडल्याने किरकोळ जखमी झाले. दरम्यान, कॅम्प शहरात हजारोंच्या संख्येने आलेल्या तरुणांनी मिळेल तेथे रात्र काढल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ झाली.येथील प्रादेशिक सेनेच्या वतीने टीए ११६ पॅराट्रप बटालियनमध्ये वर्षभरातून एकदा भरतीप्रक्रि या आयोजित करण्यात येते. यामध्ये तरु णांना खुल्या पद्धतीने सहभाग घेता येतो. त्यामुळे या भरतीसाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. पहाटे सुरू झालेल्या भरतीप्रक्रियेत लष्कराकडून कागदपत्रांसाठी लावण्यात आलेल्या अटी व शर्थी पूर्ण करू न शकल्याने अनेकांच्या पदरी निराशा आली. देवळालीच्या आनंद रोड येथील स्व.बाळासाहेब ठाकरे स्टेडियमवरील मैदानावर बुधवारी महाराष्ट्रातील तरुणांकरिता भरतीप्रक्रि या पार पडली. त्यासाठी राज्यभरातून दोन दिवस आधीपासूनच ३० हजारांपेक्षा जास्त युवक कॅम्पमध्ये दाखल झाले होते.भरतीसाठी झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता पहाटेच भरतीप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. पहाटे ३ वाजेपासून शंभरची तुकडी करून युवकांना आनंद रोड मैदानाकडे सोडण्यात आले. यावेळी झालेल्या रेटारेटीमुळे काही तरुण किरकोळ जखमी झाले. तर उपद्रव करणाऱ्या तरुणांना बाहेर काढण्यात आले.यावेळी मैदानावर भरतीसाठी आलेल्या तरुणांचा जन्मदाखला, शैक्षणिक दाखला व कागदपत्रे, क्र ीडा, रहिवासी दाखला, विवाहित अथवा अविवाहित असल्याचा पुरावा, सहा महिन्यांपर्यंतचा चारित्र्य दाखला, जातीचा दाखला, प्रतिज्ञापत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र यांसह सर्व शैक्षणिकपात्रता असलेले मार्कशिट, शाळा व महाविद्यालयीन काळामधील खेळात मिळवलेली प्रमाणपत्रे, सर्व मूळ प्रमाणपत्रे आदींसह सेवारत, माजी सैनिक, शहिद जवान व वीरपत्नी यांचे प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रे तपासणीनंतर वयोगटानुसार त्यांची विभागणी करत युवकांना टीएच्या मुख्य मैदानाकडे सोडण्यात आले. तेथे या युवकांसाठी चहा- नाश्त्याची सोय करण्यात आली होती. त्यानंतर टीए पॅराच्या प्रशिक्षण केंद्रातील मैदानावर १.६ किमी अंतर मर्यादित वेळेत अंतर पार पाडण्यासाठी सोडण्यात आले. या प्रक्रि येत प्रत्येक ठिकाणी बाद होणाºया उमेदवारांच्या हाताला लाल रंग लावून बाहेर काढण्यात येत होते. दरम्यान शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना मोफत भोजनाची सोय करण्यात आली होती.
लष्कराच्या ६३ जागांसाठी ३० हजार तरुणांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 1:21 AM