लोकमत न्युज नेटवर्कयेवला : शहरातील तिघे बाधित बुधवारी (दि.१९) कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.तालुक्यातील गवंडगाव येथील ४२ वर्षीय बाधित पुरूषाचा मंगळवारी (दि.१८) नाशिक रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर शहरातील एक बाधित महिला नाशिक रूग्णालयातून कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे. खाजगी लॅबकडून तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील ६७ वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला असला तरी अद्याप शासकीय पोर्टलला याची नोंद झालेली नाही.दरम्यान, आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बुधवारी, (दि.१९) शहरातील २ बाधित नाशिक येथील रूग्णालयातून तर एक बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून असे एकुण तिघे पुरूष कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २७५ झाली असून आजपर्यंत २३८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १६ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी हितेंद्र गायकवाड यांनी दिली.बाधितांपैकी बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात एक, होम क्वारंटाईन एक, नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५, नाशिक जिल्हा रूग्णालयात ५ तर खाजगी रूग्णालयात ४ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.
येवल्यातील तिघे बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 6:48 PM
येवला : शहरातील तिघे बाधित बुधवारी (दि.१९) कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
ठळक मुद्देतालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २७५ झाली असून आजपर्यंत २३८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.