शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

तीघे ताब्यात : दरोडेखोर-पोलिसांमध्ये चकमक; भल्या पहाटे थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 1:29 PM

दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

ठळक मुद्देगोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाल्याचे बोलले जात आहे.दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

पंचवटी : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोणार्कनगर परिसरातील एका सराफाचे दुकान फोडून त्यामध्ये लूट करून चौघे संशयित दरोडेखोर चारचाकी वाहनातून पोबारा करत असताना आडगाव गस्त पथकाला माहिती मिळाली; गस्त पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला; मात्र दरोडेखोरांनी वाहन थांबविले नाही. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील हिरावाडी परिसरातील गुंजाळबाबानगरमध्ये वाहन वळविण्याचा प्रयत्न केला असता महावितरणच्या विद्युत खांबाला वाहनाने धडक दिली अन् वाहन उलटले यावेळी दरोडेखोरांनी जवळील पिस्तुलने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला त्यास पोलिसांनीदेखील तसेच प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चौघे दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेले व एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर सकाळ उजाडताच मनमाड येथून दोघा दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. गोळीबार अन् वाहनाच्या धडकेच्या आवाजाने हिरावाडी परिसरातील नागरिक जागे झाले. काही अनुचित प्रकार घडला की काय, या भीतीने त्यांच्या काळजाचा ठोका भल्या पहाटे चुकला; मात्र घटनास्थळी पोलीसांची कुमक बघून रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आर.के.ज्वेलर्स दुकानाला लक्ष्य केले.सोन्याचांदीचे दागिणे घेऊन हे दरोडेखोर टाटा इंडिका मोटारीतून (एम.एच१५ बीडी.९०६६) आले होते. दरोडेखोरांनी ही मोटार शहरातून चोरी करत गुन्हा घडविल्याची माहिती समोर येत आहे. दरोडेखोर दुकान फोडत असल्याची माहिती आडगाव पोलिसांच्या रात्रपाळीवरील गस्त पथकाला मिळाली. तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहचले असता पोलिसांनी बघून चार ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने इंडिकामध्ये बसून घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांच्या वाहनाने त्या मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू ठेवला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत तत्काळ पंचवटी, आडगाव, भद्रकाली, नाशिकरोड, सरकारवाडा, म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करण्याचे आदेश बिनतारी संदेश यंत्रणेवरून रात्रीच्या गस्त पथकांना दिले गेले. तसेच पंचवटी पोलिसांनाही वृंदावननगरच्या दिशेने रवाना होण्याचे आदेश मिळाले. दरोडेखोरांनी वाहन पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिरावाडी परिसरातील गुंजाळमळ्यात धाडले. यावेळी वृंदावन कॉलनीजवळ महावितरणच्य विद्युत खांबाला आधार असलेल्या ‘ताण’च्या लोखंडी तारेत वाहन अडकून उलटले.यावेळी वाहनाच्या आडून दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी गस्त पथकातील पोलीस निरिक्षक गणेश झेंडे, विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे, हवालदार अनिल केदारे, मिथुन गायकवाड, लक्ष्मण बोराडे आदींनी गोळीबार केला. यावेळी अंधाराचा फायदा घेत तीघे दरोडेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यास यशस्वी ठरले तर एका दरोडेखोराला पोलिसांनी जागीच बेड्या ठोकल्या. दोघे संशियत नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळ झोपडपट्टीमधील तर अन्य नगर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून राजेश गोलासिंग टाक याला ताब्यात घेतले तर हरदीपिसंग बबलूसिंग टाक, अमनिसंग भोंड या दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.--

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडाArrestअटकFiringगोळीबारVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील