शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:31 AM

प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नाशिकरोड : प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.जेलरोड धारबळे मळा, विठ्ठलनगर येथील सागर संदीप अहिरे (१९) याचा शनिवारी जेलरोड गोदावरी नदी पात्रालगत खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. खुनाची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मयत सागरची ओळख पटताच पोलिसांनी तपास सुरू केला असता अवघ्या दोन तासांत संशयित अजय दीपक जाधव (२०), राकेश नाना घुमरे (१९) आणि राहुल उर्फ रोमिओ राजेश राहटळ (२१ सर्व रा. जेलरोड शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरचा खून केल्याची कबुली दिली.या तिघांपैकी एकाच्या बहिणीला सागरने प्रेम व्यक्त केल्याची बाब तिच्या भावाला समजल्यानंतर तो संतापला होता. शनिवारी सायंकाळी संशयितांनी सागरला घेऊन जात गोदावरी नदीपात्राच्या कडेला त्याची हत्त्या केली.झुडपात सर्वांनी मद्यपान केले. तेथे लपवलेला कोयता काढून सागरच्या मान, डोक्यावर वार करून पलायन केले. सागरचा जागीच मृत्यू झाला. सागरला या तिघांसोबत अन्य मित्रांनी पाहिले होते. केवळ तेवढ्या गोष्टीचा आधार घेत पोलिसांनी हल्लेखोरांना दोन तासांत अटक केली. रविवारी तिघा संशयितांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी