शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जेलरोडला टोळक्याकडून तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:39 PM

जेलरोडच्या जिजामातानगर येथे चौघांच्या टोळक्याने कारची काच फोडून तिघा युवकांना मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.

नाशिकरोड : जेलरोडच्या जिजामातानगर येथे चौघांच्या टोळक्याने कारची काच फोडून तिघा युवकांना मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.गायकवाड मळा प्राईड आॅर्चिड येथे राहणारा युवक महेश रंगनाथ गायकवाड याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास मित्र ओंकार जयंत देशपांडे याच्या मालकीच्या कार (एमएच १५, डीएस ७३७०) मधून मित्र मुकेश सिंग असे तिघे जेलरोडकडून आरंभ महाविद्यालयाकडे जात असताना जिजामातानगर येथे गाडीतील साहित्य द्यायचे असल्याने गाडी थांबवली असता त्या ठिकाणी अनिकेत वाजे हा गाडीच्या बोनेटवर येऊन बसला.गाडीवर का बसला अशी विचारणा केली असता अनिकेत वाजे याने मी आत्ताच जेलमधून आलो आहे, असे म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. वाजे याच्यासोबत अजिंक्य सोपे, प्रथमेश जाधव, बाळा शिरसाठ या चौघा जणांनी देशपांडे याच्या कारच्या पुढील काचेवर दगड फेकून काच फोडली. नंतर चौघांनी तिघा युवकांना लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने मारहाण केली. ओंकार देशपांडे याच्या पायावर दगड फेकून जखमी केले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयावरून महिलेसह मुलीवर वारनाशिकरोड : पत्नीसोबत महिलेच्या मावस पुतण्याचे प्रेमसंबंध आहेत, या कारणावरून महिलेस व तिच्या मुलीवर नेलकटरमधील चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली.जुना ओढारोड, नेहे मळा येथील अंजना काळू दोंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्र वारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलीसह घरात होत्या. त्यांच्या शेजारी राहणारा संशयित नागेश हानचाटे हा घरी आला. अंजना यांना तुमचा मावस पुतण्या संदेश मोरे याचे माझ्या पत्नीशी प्रेमसंबंध आहेत. तो आमच्या घरी येतो, असे सांगून कुरापत काढून अंजनाच्या मनगटावर व तिच्या मुलीच्या गळ्यावर नेलकटरमधील चाकूने वार करून जखमी केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उसने पैसे मागितल्याने वादनाशिकरोड : देवळालीगाव, धनगर गल्ली, साईबाबा मंदिरामागे भांडण सोडवले व उसने पैसे मागितले, या कारणावरून वाद झाल्याने परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.देवळालीगावातील धनगर गल्लीतील किरण बबनगीर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्र वारी दुपारी चारच्या सुमारास उसने पैसे मागितल्याचा राग धरून संशयित सागर राजू सौदे, संजय झांजोटे यांनी किरण व त्याचा भाऊ सचिन यांना उलट्या कोयत्याने पायावर, गुडघ्यावर मारहाण केली. देवळालीगाव गांधीधाम येथील संजय सुरेश झांजोटे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भांडण सोडविण्यास गेलो होतो. त्याचा राग आल्याने किरण व सचिन गोसावी यांनी आपल्या उजव्या गालावर, छातीवर, हाताच्या बोटांवर कोयत्याने वार करून जखमी केले. संजयचा आतेभाऊ सागर सौदे याच्या हातावर वार करून जखमी केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी