साकोरा - नांदगाव तालुक्यातील जामदरी येथे शुक्र वारी सकाळी विजप्रवाह सुरू असलेली तार तुटून तीन म्हशीच्या अंगावर पडल्याने तर साकोरा येथे सायंकाळी चार वाजता रस्त्यावर साचलेल्या डबक्यात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने एका बैलाचा अशा चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नांदगाव तालुक्यात सद्या आठवड्यापासून संततधार सुरू असून, शेतकरी सुखावला आहे.मात्र काल शुक्र वार रोजी जामदरी येथील रहिवासी संजय वेडूजी पिरनाईक सकाळी आपल्या मालकीच्या तीन म्हशी घेऊन वीजेच्या तारांखालून जात होते. अचानक विज तार तुटून या म्हशीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यात त्यांचे दोन लाख तीस हजारांचे नुकसान झाले. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी जी.एस.जाधव यांनी म्हशींची पाहणी करून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले तर येथील तलाठी जी.एस.ननई यांनी पंचनामा करून अंदाजे जीवितहानी झाल्याची शासकीय दप्तरात नोंद केली आहे. यावेळी गावातील प्रविण इनामदार, भगवंत देशमुख, विक्र म इनामदार, भगवान देशमुख, बापु गवळे, राजेंद्र इनामदार आदी उपस्थित होते.साकोरा येथे सायंकाळी चार वाजता गावातील शिवाजी वाल्मिक बोरसे हे आपली बैलजोडी घरी घेवून येत असतांना पिंजरबर्डी शिवारात रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात दोन्ही बैलांना वीजेचा धक्का लागला. बोरसे यांना कळण्याच्या आत त्यांना स्वत:ला जोरदार झटका बसल्याने ते आणि एक बैल बाजूला फेकल्याने त्यांचा जीव वाचला तर एक बैलाचा जागेवर मृत्यू झाला.ऐन दुष्काळी परिस्थितीशी तोंड देत असतांना गेल्या वर्षी बोरसे यांनी ही बैलजोडी पन्नास हजार रु पयांत आणली होती.यावर्षी सर्व शेतीकाम करून आता फक्त गवत खाऊ घालण्याचे काम सुरू असतांना अचानक हा घाला आल्याने सबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
विजेच्या धक्याने तीन म्हशी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:14 PM