निफाड : तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे शनिवारी दि 21 रोजी ऊसतोड चालू असताना ज्या शेतात बिबट्याचे एक बछडे सापडले होते त्याच शेतात दि 24 रोजी मंगळवारी बिबट्याचे अजून दोन बछडे सापडल्याची घटना घडली आहे चार दिवसांच्या अंतरात याच शेतात सापडलेल्या बछड्यांची संख्या 3 झाली आहे हे तिन्ही बछडे 20 दिवसाचे आहे तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे गंगाधर दादा मुरकुटे यांच्या शेतात ऊसतोड चालू होती शनिवारी दि 21 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मुरकुटे याना उसाच्या या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले होते हि माहिती येवला वनविभागाला कळवण्यात आली त्यानंतर तातडीने हे नर बछडे वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते व त्यानंतर तातडीने येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे विचुरचे ,वनरक्षक विजय टेकणर , अनकईचे वनरक्षक प्रसाद पाटील , वनसेवक दिलीप अिहरे ,विजय लोंढे , रामचंद्र गंडे , दत्तू आहेर ,संजय गुंजाळ , संजय दाणे ,भारत माळी,पिंटू नेहरे आदी म्हाळसाकोरे येथे दाखल झाले व त्यांनी हे दोन बछडे ताब्यात घेतले. या दोन पैकी एक बछडे हे नर असून दुसरे हे मादी बछडे आहे बछड्यांच्या ओढीने मादी या क्षेत्रात येऊ शकते या शक्यतेने तिला पिंजर्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शिनवरीच मुरकुटे यांच्या शेतात पिंजरा लावला आहे (वार्ताहर)
म्हाळसाकोरेत आढळले बिबट्याचे तीन बछडे
By admin | Published: January 24, 2017 10:50 PM