लोकमत न्यूज नेटवर्कझोडगे : मालेगाव तालुक्यातील झोडगे व जळकू येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन सील करण्यात आले आहे. झोडगे येथील एक तर जळकू येथील एक महिला व एक इसम असे तिघे बाधित मिळून आले.७२ अहवालातून ३५ पॉझिटिव्ह असून, त्यात या तिघांचा समावेश आहे. गावात कोरोनाचा रुग्ण आढळून येताच ग्राम पालिकेतर्फे ग्रामस्तरीय समितीची बैठक होऊन बाधित व्यक्तीच्या घराचा परिसर सील करण्यात आला. त्या घरापासून २०० मीटरपर्यंत कंटेन्मेंट दोन घोषित केला जाऊन त्या घराचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. गाव रविवारपासून पुढील पाच दिवस गुरुवारपर्यंत पूर्णपणे बंद राहाणार असून, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.परिसरात तंबाखू गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. ग्रामस्थांनी तोंडाला मास्क लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ शेजवळ, पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, सरपंच कल्पना देसले, उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक बच्छाव, तलाठी, मंडळ अधिकारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहणी केली.
संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणसंपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, काम नसताना घराबाहेर निघणे, फिरणे, रेंगाळणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संपूर्ण गावाचे संरक्षण करण्यासाठी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाला दूर ठेवणाºया झोडगे परिसरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.