नाशिक : राज्य शासनाच्या वतीने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्र मांतर्गत नाशिक महापालिकेला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दहा ते पंधरा फूट उंचीची ही रेडिमेड झाडे खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रु पये महापालिका मोजणार आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने महापालिकेने धावपळ करीत जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जुलै रोजी १३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, त्यांनादेखील वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महापालिकेला बारा हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सदरच्या झाडे लावण्यासाठी तीन कोटी रु पयांची निविदा मनपा काढणार आहे. दहा फुटांपेक्षा अधिक उंचीची रोपे खरेदी केली जाणार असून, ती लावल्यानंतर वृक्षसंवर्धनाचा तीन वर्षे मुदतीचा ठेका दिला जाणार आहे. शहरातील मनपाच्या खुल्या जागा, शिक्षण संस्था तसेच, रु ग्णालयांच्या आवारात आणि रस्त्याच्या दुतर्फा, ही झाडे लावण्यात येणार आहे. त्यासाठी निवडलेल्या ५४ ठिकाणी १२ हजार ४३२ खड्डे खोदण्यात आले असून, त्यांना जिओ टॅगिंगदेखील करण्यात आले आहे. हरितसेना संकेतस्थळावर नोंददेखील करण्यात आली आहे. खड्डे खोदले असले तरी वृक्षांचा पत्ता नसून आता वृक्षखरेदीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. आचारसंहिते आता महापालिकेने सहा. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे.८७ टक्के वृक्ष सुस्थितीतवृक्षलागवडीनंतर ते जतन करण्याचे आव्हान असले तरी गतवर्षी लावलेल्या झाडांपैकी ८७ टक्के झाडे सुस्थितीत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.४२०१६ मध्ये महापालिकेला तीन हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मनपाने ३०६८ वृक्षांची लागवड केली असून आजमितीस २२७० म्हणजे ७४ टक्के वृक्ष सुस्थितीत आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मनपाला देण्यात आलेल्या पाच हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्टाच्या तुलनेत मनपाने ५,१६६ झाडांची लागवड केली. त्यापैकी ४,४९० (८७ टक्के) वृक्ष सुस्थितीत असल्याचा दावा मनपाने केला आहे.
रेडिमेड झाडांसाठी तीन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:58 AM