नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्गंत सन-२०१४-१५ पासून अपंगासाठी राखीव असलेला सुमारे ४ कोटींचा निधी अखर्चित राहीला आहे. या निधीतून ७५ टक्के रक्कम सामुहीक लाभार्थ्यांसाठी तसेच २५ टक्के रक्कम वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे या ७५ टक्के निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याचा निर्णय समाजकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
अपंगासाठी बांधणार तीन कोटींची शौचालये
By admin | Published: June 02, 2017 7:14 PM