लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाल्यानंतर महापालिकेच्या नालेसफाई आणि अन्य कामांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे गंभीर झालेल्या आयुक्तांनी शहरातील नालेसफाई, चेंबर दुरुस्तीची कामे येत्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे अल्टिमेटम आरोग्य, बांधकाम व भूमिगत गटार योजना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककरांची दैना उडाली. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळापूर्व कामे केल्याचा दावा केला होता. या कामांचे पितळ या पावसाने उघडे पाडले. बाजारपेठा आणि रस्ते जलमय झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच अनेक भागात पाणी साचल्याने महापालिकेवर रोष व्यक्त करण्यात येत असून, त्यातून आयुक्तांनी नालेसफाईसाठी तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यासंदर्भात आयुक्त अभिषेक कृष्ण यांना विचारले असता बुधवारी सायंकाळी अवघ्या दीड तासात ९२ मि.मी. पाऊस झाला. पहिल्या तासभरातच ८५ मि.मी. पावसाचा वेग होता. महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेची पाणी वहन क्षमता २७.५० मि.मी. पावसाइतकीच आहे. त्यामुळे पाणी निचरा होण्यासाठी वेळ लागला. पहिला पाऊस असल्यामुळे प्लॅस्टिक पिशव्या तसेच अन्य कचरा वाहून ड्रेनेजमध्ये अडकला त्यामुळेदेखील पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झाले, असे ते म्हणाले. या प्रकारांच्या अतिक्र मणांमुळे गटारींचे चेंबर झाकले गेले. परिणामी नाशिक शहरात काही भागात पाणी साचले होते. अर्थात, पावसाळ्यानंतर साचलेले पाणी वाहते करण्याची जबाबदारी महापालिकेला टाळता येणार नाही.
नालेसफाईसाठी तीन दिवसांचा अल्टिमेटम
By admin | Published: June 17, 2017 12:29 AM