नाशिक : चौथा शनिवार व ख्रिसमसच्या शासकिय सुटीमुळे यंदा सलग तीन दिवस जोडून सुट्टया आल्या. या संधीचा फायदा घेत नाशिककर मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले. नाशिकककरांचे आवडते ठिकाण असलेले व निसर्गसंपदेने नटलेले भंडारदरा हे जवळचे डेस्टिनेशन बहुतांश कुटुंबियांनी गाठले आहे. बॅकवॉटरभोवती बोच-या थंडीत कॅम्पींगचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकभंडारर्याला शनिवारी सकाळपासून दाखल झाले आहेत. धरणाच्या बॅकवॉटरभोवती सुमारे दोनशेहून अधिक तंबू पडले आहेत.डिसेंबर महिन्यात नाताळ अर्थात ख्रिसमसच्या विविध शाळांना किमान आठवडाभराची सुटी असते. या सुटीचा फायदा घेत बहुतांश कुटुंब पर्यटनासाठी विविध पर्यटन स्थळांना जाण्याचा बेत आखतात. यंदा मात्र वीकेण्ड तीन दिवसांचा मिळाल्याने नाशिककरांचा आनंद अधिक द्विगुणित झाला आहे. वीकेण्डला ख्रिसमस आल्यामुळे तीन दिवसांचा पर्यटनासाठी वेळ नागरिकांना मिळाला. यामुळे नागरिक कुटुंबांसह घराबाहेर पडले. शहरातील बसस्थानकांवर गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे भाविक पर्यटकांचीदेखील संख्या शहरात वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तीन दिवसांचा वीकेण्ड : थंडीत कॅम्पींग अन् बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर भंडारदर्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 6:59 PM
‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे.
ठळक मुद्देधरणाच्या बॅकवॉटरभोवती सुमारे दोनशेहून अधिक तंबूभंडारदरा हे पर्यटनस्थळ नाशिकपासून ७० किलोमीटर अंतरावर शैक्षणिक सहली धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आदिवासी तरुणांंना रोजगारनिर्मिती