नाशिक : मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गंत के. के. वाघ महाविद्यालय ते हॉटेल जत्रा व ओझर, पिंपळगाव बसवंत येथे नवीन उड्डाणपुलाच्या कामांना राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने पावसाळ्यापुर्वी तीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचे नियोजन पुर्ण झाले असून, ओझर येथे रस्ता रूंदीकरणाचे तसेच समांतर रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने या भागातील वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होत आहे.केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिड वर्षापुर्वी या कामांचे भुमीपूजन करण्यात आले होते. सुमारे ४४८ कोटी रूपये खर्चाच्या या कामांना प्रशासकीय मान्यता देवून त्याच्या निविदाही मंजुर करण्यात आले असून, त्यातील ओझर व पिंपळगाव येथील कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गंत गोंदे ते पिंपळगाव दरम्यान काम सुरू असताना ओझर व पिंपळगाव या राष्टÑीय महामार्गावर वसलेल्या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांनी चौपदरीकरणाला प्रारंभी विरोध करून जागा देण्यास नकार दिला होता, त्यानंतर समझोता होवून गावाला छेदून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर ओझर व पिंपळगाव बसवंत येथे नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुल उभारण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या विरोधामुळे ओझर व पिंपळगाव येथे सुमारे एक किलो मीटर अंतरापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण गेली दहा वर्षे होऊ शकले नव्हते. दरम्यान, पिंपळगाव व चांदवड येथे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने टोल आकारणी सुरू केल्यानंतर ओझर व पिंपळगाव बसवंत येथील रखडलेल्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यापार्श्वभुमीवर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने ओझर व पिंपळगाव बसवंत येथे उड्डाणपुल उभारण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर प्रशासकीय मान्यता, निविदा मागविण्यात येवून सुमारे ४४८ कोटी रूपये खर्चाच्या या कामासाठी बी. पी. सांगळे व एस. आर. इन्फ्रा या कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्गावर ओझर येथे बाणगंगा नदीला समांतर पुलाची उभारणी त्याच बरोबर खंडोबा मंदीरासमोरून सुमारे ९०० मिटर लांबीचा उड्डाणपुल उभारण्यात येणार असून, पिंपळगाव बसवंत येथे देखील ९०० मिटर लांबीचे दोन उड्डाणपुलाच्या बांधणीची तयारी केली जात आहे. ओझर येथे महामार्गाला लागून समांतर रस्त्याचे काम सुरू झाले असून, उड्डाणपुलाच्या कामाला पावसाळ्यापुर्वी सुरूवात करण्याचे नियोजन आहे तर पिंपळगाव येथे जमिनीच्या मातीचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन उड्डाणपुलाचे काम पावसाळ्यापुर्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:47 PM
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिड वर्षापुर्वी या कामांचे भुमीपूजन करण्यात आले होते. सुमारे ४४८ कोटी रूपये खर्चाच्या या कामांना प्रशासकीय मान्यता देवून त्याच्या निविदाही मंजुर करण्यात आले असून, त्यातील ओझर व पिंपळगाव येथील कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले
ठळक मुद्दे४४८ कोटी खर्च : राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयारी