ब्राह्मणगांव : येथील टपाल कार्यालयातील तीन चार महिन्यातील दैनंदिन येणारी टपाल व महत्वाचे कागदपत्र संबंधित पोस्टमन यांनी न वाटप केल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.येथे टपाल कार्यालयातील कार्यरत असलेले पोस्टमन दैनंदिन टपाल लखमापुर कार्यालयातुन ब्राह्मणगांव येथे आणून, वाटप ऐवजी ते गोणीत साठवण करून ठेऊन गोणी पोस्ट कार्यालयात झाकून ठेवली. नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ट्रॅक्टरचे परवाने,बजाज अलायन्स पॉलिसी किट,तर देना बँकेचे चेक,एच.डी.एफ.सी चेक,पासबुक त्यात लोकांच्या आर डी, सुकन्या योजना अशी महत्त्वाची टपाल वाटप केली नाहीत अशी ग्रामस्थांनी तक्रार केल आहे. टपाल मिळत नसल्याने तर पोस्ट मास्तर कार्यालयात नेहमीच गैरहजर राहत असल्याने संबंधित टपाल विभागाचे ए.एस.पी. सब डिव्हीझन मालेगांव यांनी ब्राह्मणगांव टपाल कार्यालयात असलेल्या टपालांची पाहणी करून पंचनामा केला.सदर मिळालेली कार्यालयातील टपाल दोन तीन महिन्यांपासून वाटप केलेनाही. सटाणा व मालेगांव येथील पोस्ट आॅफिसचे कर्मचारीटपाल वाटपाचे करीत आहेत. ग्रामस्थ आधारकार्ड स्वत: घेऊन जात आहेत.टपाल कार्यालयात नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड,विविध बँकांचे पासबुक, चेक पुस्तक, एल आय सी सिर्टिफकेट वाटप ऐवजी गोणी भरून ठेवलीआहेत.महत्त्वाचे विविध कागदपत्रे टपाल विभागाकडून वेळेवर न मिळाल्याने नागरिकांना कुठे महा ई सेवा केंद्र तर बँके कडे वारंवार जाऊन हेलपाटे मारावे लागले जेव्हा ही बाब उघडकीस आल्याने महत्त्वाची कागदपत्रे टपाल कार्यलयात मिळून आली.त्यात आधार कार्डाची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.या टपाल विभागात पोस्ट मास्तर व पोस्टमनची जागा रिक्त असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तात्पुरता पदभार पोस्ट मास्तर म्हणून नितीन पाटील (बैंद्रे पाडा) यांचे कडे देण्यात आला आहे.
ब्राह्मणगाव पोस्ट कार्यालयात तीन चार महिन्यापूर्वीचे टपाल पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 6:09 PM