शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पिस्तूल विक्री करताना तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 1:12 AM

संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देउपनगर बस थांबा : वीस लाखांचा मुद्देमाल जप्त; एक फरार

नाशिकरोड : संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व इतर अधिकाऱ्यांनी आम्रपाली झोपडपट्टी परिसरात बुधवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत कोम्बिंग आॅपरेशन मोहीम पूर्ण केली. त्यानंतर कोकाटे हे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असता उपनगर नाका सिग्नलजवळ उभ्या असलेल्या बलिनो मोटार (एमएच १५, जीएल ४३७९) व काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (एमएच १२ एचएफ ४२९७) या वाहनांवर त्यांचा संशय बळावला. कोकाटे यांच्यासोबत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ पठाण, ज्ञानेश्वर कसबे यांनी त्वरित तेथे थांबून उभ्या असलेल्या चौघा युवकांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना सदर घटनेची माहिती मिळाल्याने तेदेखील पोलीस कर्मचाºयांसह दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मोटारींची झडती घेण्यास सुरुवात केली असता चौघांपैकी तिघे पोलिसांच्या हाती लागले मात्र त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. कोकाटे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी असूनही एका संशयिताने हातावर तुरी देऊन पोबारा केला. संगमनेरमधून आलेला अमजद दाऊद सय्यद याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व ५६ हजार ४५० रुपयांची रोकड हस्तगत केली. अमजद व त्याचा साथीदार पिस्तूल व काडतुसे काठेगल्ली येथील सुदर्शन प्रदीप शिंदे व वडाळागावातील सदाशिव पाराजी गायकवाड यांना विक्री करण्यासाठी आले होते.एक सराईत गळाला; दुसºयाचा गुंगारासंशयित इमरान पठाण (रा. मोगलपुरा) हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. सुदर्शन, सदाशिव यांच्यासह अमजदला पोलिसांनी अटक केली आहे. सदाशिव हा वडाळागावातील घरकुलच्या इमारतीत वास्तव्यास असून तो यापूर्वी फुले झोपडपट्टीत राहात होता.पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर इंदिरानगर, भद्रकालीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. घरफोड्या, हाणामाºया, जबरी लूट यांसारख्या गुन्ह्यांची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी