शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

विकास आराखड्यात तीन हॉकर्स झोन

By admin | Published: November 22, 2015 12:07 AM

खासगी जागांवर आरक्षण : ताबा घेण्याबाबत पालिकेचा विचार

नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या फेरीवाला क्षेत्राच्या आराखड्याची अंमलबजावणी जानेवारी २०१६ पासून होण्याची शक्यता असतानाच सुधारित विकास आराखड्यातही तीन ठिकाणी हॉकर्स झोनसाठी आरक्षण टाकण्यात आल्याने संबंधित जागांचाही पालिकेने विचार सुरू केला आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील सुमारे १९० ठिकाणे फेरीवाला क्षेत्र म्हणून निश्चित केली आहेत.राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने सहाही विभागात फेरीवाला क्षेत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. शहर फेरीवाला समिती, पोलीस आयुक्तालय यांच्या संमतीनंतर महापालिकेने सहाही विभाग मिळून सुमारे १९० हून अधिक ठिकाणी फेरीवाला क्षेत्र निश्चित केले असून, ८९ ठिकाणे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून निश्चित केली आहेत. या फेरीवाला क्षेत्रासाठी महापालिकेकडे दहा हजारांहून अधिक फेरीवाल्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना प्रत्यक्ष जागांचे वाटप आयुक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर जानेवारी २०१६ मध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिकेने फेरीवाला क्षेत्राचा आराखडा निश्चित केलेला असतानाच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित शहर विकास आराखड्यातही तीन ठिकाणी हॉकर्स झोनसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने, नाशिक झोनमध्ये सर्व्हे नंबर २४१ (पै) वर ३१८० स्क्वेअर मीटर खासगी जागेत, तसेच नाशिक झोनमध्येच सर्व्हे नंबर ५२८ (पै) वर २९८० स्क्वेअर मीटर खासगी जागेत आरक्षणाचा समावेश आहे. तर देवळाली विभागात सर्व्हे नंबर २४२ (पै) वर २८७५ स्क्वेअर मीटर जागेत हॉकर्स झोन तथा खोक मार्केटसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. सदर आरक्षणाची जागा संपादित करण्याची जबाबदारी महापालिकेची राहणार असून त्यासाठी महापालिकेला सुमारे २० कोटी रुपये मूल्य मोजावे लागण्याची शक्यता आहे. सुधारित विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या हॉकर्स झोनसाठीच्या आरक्षणांसंबंधी नगररचना विभागाकडून अधिक माहिती मागविण्यात आली असून, सदर जागा महापालिकेच्या मालकीच्या नसल्याने त्यांचा ताबा घेण्याबाबत पालिकेने विचार सुरू केला आहे. (प्रतिनिधी)