शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

घामाच्या धारा! उष्णतेचा कहर सुरू असताना 'या' शहरात 3 तासांचे भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:49 PM

नाशिक : राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट आले आहे. त्याचा ...

नाशिक : राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट आले आहे. त्याचा फटका नाशिककरांनाही बसणार असून, शहरात सुमारे तीन ते साडेतीन तासांचे भारनिमयन सोमवारपासून होणार आहे.

सोमवार ते बुधवार सकाळी ७.३० ते ९ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ४.१५ पर्यंत, तर गुरुवार ते रविवारी सकाळी ९ ते १०.४५ आणि दुपारी १६.१५ ते सायंकाळी ५.४५ या कालावधीत पवननगर, राणेनगर, गंगाघाट, कृषीनगर, विद्याविकास सर्कल, पाटील कॉलनी, सदगुरू नगर, राजेबहाद्दर, उदोजी मराठा या भागात भारनियमन होणार आहे.

सोमवार ते बुधवार सकाळी ९ ते १०.४५ आणि दुपारी १६.१५ ते सायंकाळी ७.१५ पर्यंत, तर गुरुवार ते रविवारी ७.३० ते ९ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ४.१५ पर्यंत अश्विन नगर, विजयनगर, पीॲन्डटी कॉलनी, नवीन साधुग्राम, माघ सेक्टर, चव्हाण, मळा, सहदेव नगर, उंटवाडी, महात्मानगर, सावरकर नगर येथे भारनियमन होणार आहे.

त्याचप्रमाणे उत्तमनगर, एकतानगर, कुलकर्णी काॅलनी, त्रिमूती चौक, पंचक, गायत्रीनगर, पंचवटी, क्रीडा संकुल, टिळकवाडी या ठिकाणी सोमवार ते बुधवार सकाळी साडेसात ते साडेनऊ, गुरुवार ते रविवार सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत भारनियमन होणार आहे. दुपारीदेखील दोन आणि चार वाजता दीड तासांचे भारनियमन होणार आहे.

सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी चार ते सहा या वेळेत, तसेच गुरुवार ते रविवार सकाळी साडेसात ते साडेनऊ, तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत म्हसरूळ, पेठरोड, गोरक्षनगर, अशोकस्तंभ, आरटीओ, विशाल पाॅईंट, एसटी काॅलनी, अमृतधाम, राममंदिर, सातपूर या ठिकाणी भारनियमन होणार आहे.

कलानगर, कालिकानगर, सिंहस्थनगर, साईनगर, रविवार कारंजा, गोविंदनगर येथे सोमवार ते बुधवार सकाळी सहा ते साडेआठ दुपारी पाऊणेदोन ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत भारनियमन होणार आहे. गंजमाळ, लेखानगर, ठक्कर, बाजार, गोविंदनगर, मोरवाडी येथेही सकाळ सायंकाळी भारनियमन होणार आहे.

सारडा सर्कल, औरंगाबाद रोड, जुने नाशिक, बुधवारपेठ, भद्रकाली मार्केट, दूधबाजार या ठिकाणी देखील सकाळ सायंकाळी तीन-तीन तासांचे भारनियमन होणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज