लोकमत न्यूज नेटवर्कपळसे : नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे-पळसे दरम्यान चौपदरीकरणामुळे बुधवारी सायंकाळनंतर तीन तास वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.चेहेडी पुलापासून शिंदे गावापर्यंत चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शिंदे गावाजवळील मंगल कार्यालयाजवळ चौपदरीकरणाच्या कामामुळे पर्यायी समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे तेथूून येणारी वाहने धीम्या गतीने जात असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच बेशिस्त वाहनधारक आपली वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. लग्नसराईमुळे महामार्ग परिसरात असलेल्या मंगल कार्यालय, लॉन्समध्ये गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
पुणे महामार्गावर तीन तास वाहतूक कोंडी
By admin | Published: May 19, 2017 12:31 AM