लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : गावाबाहेरील देवी मंदिरासमोरील भगवतीनगरमध्ये बुधवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून डल्ला मारला. दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी ऋषिकेश ढोली यांच्या घरातून रोख २० हजार, प्रत्येक एक तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चोरट्यांनी सायंकाळीच चोरी केल्याने शहर व उपनगरांत दहशत निर्माण झाली आहे. सोनसाखळी चोरीचे प्रकार बंद होण्याचे नाव घेत नसतानाच चोरट्यांची मजल सायंकाळी बंद फ्लॅट फोडण्यापर्यंत गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बुधवारी सायंकाळी तीन बंद घरांचे चोरट्यांनी कुलूप तोडले असले तरी त्यांच्या घरून फारसे काही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बुधवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, पोलीस ठाण्यात चोरीची कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.
चोरट्यांनी फोडली तीन घरे
By admin | Published: June 16, 2017 12:27 AM