नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदेदुमालाजवळील थायसनक्रूप कंपनीसमोर कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर, तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.६) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदेदुमाल्याजवळ मुंबईहून नाशिककडे भरधाव जात असताना कारचालकाचे (क्र. एमएच ०२ ईआर ७८१६) गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून जात असलेल्या दुचाकीस्वारास (क्र. एमएच १५ ईआर ९९५८) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गणेश रोहिदास पागेरे (२२, रा. नांदगाव बुद्रुक, ता. इगतपुरी), विनोद संजय बोराडे (२७, रा. मुकणे, ता.इगतपुरी) व कारचालक मोहम्मद रफिक फतिमुल्ला (४९, रा. कुर्ला, मुंबई) हे तीन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले. जखमींना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास वाडीवºहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत.
गोंदेदुमाल्याला अपघातात तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:08 AM
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदेदुमालाजवळील थायसनक्रूप कंपनीसमोर कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर, तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.६) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देजखमींना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पु