शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना चार दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 8:01 PM

नाशिकरोच्या जेलरोड परिसराच प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खुन झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देजेलरोड खुन प्रकरणातील संशयितांना अटक तीन संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : नाशिकरोड भागात  प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले होते. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.जेलरोड धारबळे मळा, विठ्ठलनगर येथील सागर संदीप अहिरे (१९) याचा शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जेलरोड दसक शिवार करंजकरनगर समोरील गोदावरी नदी पात्रात गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. खुनाची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मयत सागरची ओळख पटताच उपनगर पोलिसांनी सर्वपातळीवर तपास करण्यास सुरु वात केली होती. सहायक निरीक्षक संतोष खडके, के. टी. गोडसे, विलास गिते, किरण देशमुख, राहुल खांडबहाले यांनी अवघ्या दोन तासांत संशयित अजय दीपक जाधव (२०), राकेश नाना घुमरे (१९) आणि राहुल उर्फ रोमिओ राजेश राहटळ (२१ सर्व रा. जेलरोड शिवाजीनगर) यांना पकडले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरचा खून केल्याची कबुली दिली. या तिघांपैकी एकाच्या बहिणीला सागरने प्रेमाची मागणी घातली होती. ही बाब तिच्या भावाला समजल्यानंतर तो संतापला होता. शनिवारी सायंकाळी राकेश घुमरे, राहुल राहटळ, अजय जाधव यांनी सागरला बरोबर घेऊन जेलरोड दसक शिवार करंजकरनगरसमोरील गोदावरी नदीपात्राच्या कडेला झुडपात सर्वांनी मद्यपान केले. तेथे लपवलेला कोयता काढून सागरच्या मान, डोक्यावर वार करून पलायन केले.या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. सागरला या तिघांसोबत अन्य मित्रांनी पाहिले होते. केवळ तेवढ्या गोष्टीचा आधार घेत पोलिसांनी हल्लेखोरांना दोन तासांत अटक केली. रविवारी तिघा संशयितांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसMurderखूनgodavariगोदावरी