औंदाणे/विरगाव : साक्री-शिर्र्डी राष्ट्रीय महा महामार्गावर वनोली (ता.बागलाण) या गावाजवळ गुरुवारी (दिं.२४)रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मालट्रक व शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ हुन अधिक मजूर ही गंभीर जखमी झाले असून या सर्व गंभीर जखमींवर मालेगाव येथे उपचार केले जात आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथून शेतीकाम संपवून शिरवाडे (ता.साक्री) येथील मजूर गुरुवारी पीकअप (एम.एच.१५ एफ.व्ही. ४८३९) या वाहनाने सायंकाळी घराकडे परतत होते. यावेळी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वनोली (ता.बागलाण) या गावाजवळील म्हसोबा मंदिराजवळ खड्डे चुकविण्याच्या नादात पिक अप समोरून येणाऱ्या मालट्रक (टी. एन.८८ वाय.८३९९) च्या मागील चाकावर जाऊन आदळला. हा अपघात अत्यंत भीषण असल्याने यावेळी पिकअप थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली तर माल ट्रकचे मागील टायर फुटले. यावेळी पिकअप मधील सुमारे तीस ते चाळीसहुन अधिक मजूर रस्त्यावर फेकले जाऊन यात कान्हू आहिरे या मजुराचा यात जागीच मृत्यू झाला. तर २० हुन अधिक जखमींना तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले असता यातील २ जणांचाही ही यात मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या आता एकूण ३ झाली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून ट्रकचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा.पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली बिट पोलीस भामरे व बस्ते पुढील तपास करीत आहेत.***********************रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम चालू असतांना नूतन ठेकेदाराकडून रस्त्याची साधी डागडुजीही केली जात नसल्याने सटाणा ते ताहाराबाद हा मार्ग वाहनधारकांसाठी अक्षरश: मृत्यूचा साफळा बनला आहे. मात्र गुरुवारी रात्री सदर अपघात घडताच ठेकेदाराला अखेर जाग आली असून शुक्रवारी (दिं २५) या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास भल्या पहाटेपासूनच सुरुवात झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.