सिन्नर: सिन्नर- घोटी महामार्गावर बेलू शिवारात टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
शंकर मुरलीधर शेखर (४८), अशोक त्र्यंबक तळपे (२९) रा. घोडेवाडी व काशिनाथ आवारी (५६) रा. लहवित हे दुचाकी (क्र. एम. एच. १५/ सी. सी. ३६०१) ने सिन्नरकडे येत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या टेम्पो( क्र. एम. एच. १५/ एफ. व्ही. ६६३३) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडून गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अरुण शंकर शेखरे (२१) याने टेम्पोचालक गणेश पुंडलिक खैर (४८) रा. दिंडोरी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश परदेशी करीत आहेत.