शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
3
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
4
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
5
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
6
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
7
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
8
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
9
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
10
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
11
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
12
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
13
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
14
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
15
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
16
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
17
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
18
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
19
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
20
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

शिंदे शिवारातील अपघातात तिघांचा मृत्यू

By admin | Published: January 12, 2015 12:48 AM

शिंदे शिवारातील अपघातात तिघांचा मृत्यू

 नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे शिवारातील कडवा कॉलनीजवळ रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास इनोव्हा व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला़ यामध्ये मुंबईच्या जोगेश्वरी येथील जाबीर शेख, निजामुद्दीन अन्सारी व सायरा अन्सारी या तिघांचा मृत्यू झाला, तर हदीस अन्सारी व सुलतान शेख हे गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींना उपचारानंतर मुंबईला हलविण्यात आले़ दरम्यान, इनोव्हा कारचा चक्काचूर झाला असून, अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती़मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सोहब सिद्दीकी चाळ येथील रहिवासी जाबीर अली मोहम्मद ताहीर अली शेख (५०), निजामुद्दीन हदीस अन्सारी (४७), सायरा हदीस अन्सारी (४२), हदीस अन्सारी (५०), सुलतान जिकरीया शेख (४२) (पान २ वर)हे आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी वैजापूरला इनोव्हा कारने (एमएच ०६, एएन ७५५७) आले होते़ रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते सिन्नरहून नाशिकरोडकडे येत असताना शिंदे गावाजवळील कडवा कॉलनीजवळ नाशिककडून येणाऱ्या ट्रकवर (आरजे १९, जीबी ६६५४) जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला़ या अपघातानंतर इनोव्हाचे टायर फु टण्याचा मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी धाव अपघातस्थळी घेतली़ इनोव्हाचालक निजामुद्दीन हदीस अन्सारी व त्यांच्याशेजारी बसलेले जाबीर अली मोहम्मद ताहीर अली शेख व पाठीमागे बसलेल्या सायरा हदीस अन्सारी हे तिघे गंभीर जखमी झाले होते़ त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले, तर उर्वरित दोघे जखमी हदीस अन्सारी, सुलतान जिकरीया शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर मुंबईला हलविण्यात आले़या अपघाताची व वाहतूक कोंडीची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला़ सहायक पोलीस निरीक्षक मच्ंिछद्र केकाण, हवालदार माळोदे व कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई केली़ दरम्यान, या अपघाताची नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)