सिन्नर (नाशिक)-: तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. तिघेही मृत दुचाकीवरून प्रवास करीत होते. सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील अपघातात एक तर सिन्नर- सायखेडा रस्त्यावरील अपघातात दोघे ठार झाले. सिन्नर- नायगाव मार्गावर घाटाजवळील महादेव मंदिरासमोर आयशर टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोिलसांनी अपघाताची नोंद केली आहे. दीपक पाटोळे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. गुरुवारी दुपारी तीनला हा अपघात झाला. आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १५ बीजे ३१९५) व बजाज डिस्कव्हर (क्रमांक एमएच१५ डीडी ३७८९) यांच्यात हा अपघात झाला. दुचाकीवरील गणेश सोमनाथ टर्ले (वय१८, रा. चांदोरी, ता. निफाड), गणेश सुभाष सुरवाडे (वय २९, रा. रामाचे पिंपळस, ता. निफाड) यांना गंभीर दुखापत झाली. डोक्यास मार लागल्याने त्यांना सिन्नर नगरपरिषदेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोत केले. तर सकाळी 11.30 वाजता शिर्डी रस्त्यावर दुचाकीला अन्यात वाहनाने धडक दिल्याने मिठसागारे येथील एकजण ठार झाला. लक्ष्मण चंद्रभान चतूर(50) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांची पत्नी मंगल या जखमी झाल्या तर चार वर्षीय बालिका बचावली.
सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 7:32 PM