कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या अंतर्गत असलेली खडकवण व धनोली येथील निसर्गरम्य परिसरात रोपवाटिका फुलली असून रोपवाटिकेत खैर, आवळा, पापडा, बाहवा, करंज, शिवन आदी जातीचे तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती केली आहे. त्यात वनविभागाच्या १५२ हेक्टर क्षेत्रावर जंगलात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घरटे यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत यंदा कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून तीन लाख नव्वद हजार रोपे तयार केली आहेत. खडकवण व धनोली येथील रोपवाटिकेत रोपांचे संवर्धन करण्यात आले आहे. कनाशी वनपरिक्षेत्रात १५२ हेक्टर क्षेत्रावर रोपे लागवड करण्यात आहेत. तसेच उर्वरित रोपे ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय व इतर यंत्रणा यांना उर्वरित रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत.तयारी अंतीम टप्यात...३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. वनविभागाने ओसाड पडलेले डोंगरावर १५२ हेक्टर जागेच्या क्षेत्रावरती वृक्ष लागवड करून वनराई फुलणार आहे. तसेच रोपे लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम पुर्ण झालेले आहे.कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत खडकवण व धनोली रोपवाटिकेत २ हेक्टर जागेत विविध प्रजातीचे बीज संकलन करून रोपांची निर्मिती केली आहे. स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्र मात सहभाग घ्यावा.- देवीदास चौधरीवनमंडळ अधिकारी, कनाशी.(फोटो ०५ कनाशी, ०५ कनाशी १) खडकवण येथील रोपवाटिका
कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या रोपवाटिकेत तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 8:05 PM
कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या अंतर्गत असलेली खडकवण व धनोली येथील निसर्गरम्य परिसरात रोपवाटिका फुलली असून रोपवाटिकेत खैर, आवळा, पापडा, बाहवा, करंज, शिवन आदी जातीचे तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती केली आहे. त्यात वनविभागाच्या १५२ हेक्टर क्षेत्रावर जंगलात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घरटे यांनी दिली.
ठळक मुद्दे खडकवण व धनोली येथील रोपवाटिकेत रोपांचे संवर्धन करण्यात आले आहे.