सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (२७, रा़ अंबड लिंक रोड) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे २७ चोरलेले मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत़अंबड पोलीस ठाणे हद्दीतून मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले असून, याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या वाढत्या तक्रारींची दखल घेत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी तपासाची चक्रे फिरविली़ त्यानुसार मंगळवारी (दि़१७) सकाळी संजीवनगर येथे एका चहाच्या टपरीसमोर एक इसम मोबाइल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाने या ठिकाणी जाऊन संशयित विश्वकर्मा यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीचे ओपो, वीवो, सॅमसंग, लिनोव्हा, इंटेक्स, मायक्रोमॅक्स आदी कंपन्यांचे एकूण २७ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत़ उपनिरीक्षक तुषार चव्हाण, भास्कर मल्ले, दत्तात्रय गवारे, विजय वरंदळ, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, दुष्यंत जोपाळे, अविनाश देवरे, नितीन फुलमाळी, दीपक वाणी, मनोहर कोळी यांनी ही कामगिरी केली़
चोरीचे तीन लाखांचे मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:38 AM
सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (२७, रा़ अंबड लिंक रोड) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे २७ चोरलेले मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत़
ठळक मुद्देअंबड पोलिसांची कामगिरी चोरीचे २७ मोबाइल; संशयितास अटक