सिन्नर :तालुक्यातील कासारवाडी येथे बिबिट्यांचा हल्लयात तीन मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली. गेल्या चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका घरालगत बांधलेल्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. या घटेनत एक बोकड ठार झाला. त्यामुळे भोजापूर खोऱ्यात बिबिट्याची दहशत पसरली होती. त्यानंतर कासारवाडी येथे रघुनाथ कुशाबा सांळुंके यांच्या घरातलगत जुना वाडा असून यात ७० मेंढ्यांच्या ओरड्याच्या आवाजाने साळुंके कुटुंबीय जागे झाले. बिबट्याने कळपावर हल्ला केल्याने लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली, तसेच फटाके फोडले. फटाक्यांच्या आवाजामुळे बिबट्याने धूम ठोकली. मात्र, याघटनेत तीन मेंढ्याना प्राण गमवावे लागले. साळुंके यांना जवळपास ४० ते ५० हजाराचा भुर्दंड बसला आहे. दरम्यान, रविवारी कासारवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी नाना पावसे यांच्या घरालगत पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या व बोकड बांधलेला होता. अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने पावसे कुटंबीय घराबाहेर आले. बिबट्याच्या हल्लात बोकड ठार झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. दोन्ही घटनांबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी रुपवते यांनी पंचनामा केला. शेतकऱ्यांना वनविभागाचने तत्काळ आर्थिक मदत करावी, तसेच बिबट्याचा बंदोस्तासाठी पिंजरा लावावा अशीही मागणी होत आहे. परिसरात बिबट्याची नेहमीच दहशत असते. सध्या शेतकरी झोपण्याच्या तयारीत असतात. अशावेळी बिबट्याच्या हल्लात घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकºयांना घराबाहेर पडले धोक्याचे वाटू लागले.
बिबट्याच्या हल्लात तीन मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:03 PM