त्र्यंबकेश्वर : सध्या कोरोना कोविड-१९चा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरला सामाजिक कार्यकर्ते कुणाल दिनेश उगले यांनी तीन ऑक्सिजन सिलिंडर पूर्ण किट्सह नगरसेविका शीतल कुणाल उगले व सामाजिक कार्यकर्ते कुणाल दिनेश उगले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कोविड मदत कक्षाचे सुरेश गंगापुत्र स्वप्नील शेलार, सुशांत बागडे, उपनगराध्यक्ष सागर उजे, श्यामराव गंगापुत्र, किरण चौधरी व राहुल खत्री आदी उपस्थित होते. हे सिलिंडर सध्या कोविड मदत कक्षाच्या ताब्यात दिले आहेत. ज्यांच्या रुग्णास ऑक्सिजन गरज भासेल त्यांनी मदत कक्षाकडून घेऊन जावे, असे आवाहन नगराध्यक्ष तथा मदत कक्षाचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केले आहे. (१३ टीबीके १)
त्र्यंबकेश्वर आरोग्य विभागास तीन ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 6:59 PM
त्र्यंबकेश्वर : सध्या कोरोना कोविड-१९चा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.
ठळक मुद्देतीन ऑक्सिजन सिलिंडर पूर्ण किट्सह देण्यात आले.