टेम्पोला धडक देणाºया ट्रकची झालेली दुरवस्था.
सिन्नर : सिन्नर - संगमनेर रस्त्यावर वºहाडाचा टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. मनेगाव फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.चौघांची प्रकृती गंभीर आहे. टेम्पोतील वºहाड सिन्नर तालुक्यातील दापूर येथील आहे. दापूर येथील सुभाष सबाजी आव्हाड यांच्या मुलीचा विवाह मंगळवारी सिन्नर येथे आयोजित करण्यात आला होता. सोहळा आटोपल्यानंतर विवाहातील वºहाड दापूर येथे निघाले होते. सिन्नर-संगमनेर रस्त्यावर मनेगाव फाट्यावर समोरुन येणारा ट्रक व टेम्पो यांच्यात धडक झाली. अपघातात टेम्पोतील बबन कचरू आव्हाड, रामदास कचरू आव्हाड, मालतीबाई शिवाजी आव्हाड हे जागीच ठार झाले. तर एकजण रुग्णालयात नेत असतांना मयत झाल्याचे समजते. अपघातात तीन जण ठार ते १० ते १२ जण जखमी झाल्याचे समजले.सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक रवींद्र लोखंडे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक रहिवासी, प्रवासी यांच्या मदतीने मदतकार्य केले. अपघातानंतर घटनास्थळी सात रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जखमींना तातडीने सिन्नर व नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रात्र असल्याने अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अनेकांनी मदतकार्य केले. अपघातातील मृतांची नावे उशीरापर्यंत समजू शकली नाही. जखमींनाही नाशिक व सिन्नरच्या विविध रुग्णालयात हलविण्यात आल्याने त्यांची नावे समजली नाही.