सिडको : प्लॉटच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेऊन प्लॉट वा रक्कम परत न करता फसवणूक करणाऱ्या नागपूरच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीसाठी पैसे गोळा करण्याचे काम करणारे संशयित विनायक भट (२६, नाशिक), प्रशांत पटले (३८, नागपूर) व विनोद तितरमारे (भंडारा) या तिघांना अंबड पोलिसांनी बुधवारी (दि़ १६) अटक केली़ अंबड पोलिसांनी तक्रारदारांकडे दुर्लक्ष केल्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता़सिडको परिसरात राहणारे येथील अमित सावरगावकर, बेबी सोनवणे, गोदावरी लद्दड, अंजना देवस्थळी यांनी नागपूर येथील फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या देवपूर, सिन्नर व नाशिकच्या आॅर्चिड पार्क येथे प्लॉट घेण्यासाठी गुंतवणूक केली होती़ कंपनीने एका प्लॉटसाठी दोन लाख ५६ हजार ७२१ रुपये प्रत्येक गुंतवणूकदारांकडून जमा केले होते़ यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांबरोबर साठेखत करारनामाही केला; मात्र खरेदी देण्यास मुद्दामच टाळाटाळ करीत होते़
फिनिक्स कंपनीशी संबंधित तिघांना अटक
By admin | Published: December 16, 2015 11:54 PM