सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.ग्रामविकास विभागाकडे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य निकष समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आले होते. या समितीच्या निकषाप्रमाणे प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करून समितीने बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील चांद शाहवली बाबा दर्गा, महादेव मंदिर, निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथील श्री लोणजाई माता मंदिर, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील सदूबाई देवस्थान यांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पाटील यांनी दिली.जायखेडा गावाच्या माध्यमातून बागलाणला प्रथमच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. वारकरी संप्रदायची परंपरा जोपासणाºया कृष्णाजी माउली यांच्यामुळे जायखेडा गावाला प्राप्त आहे. दरवर्षी या गावात माउलींच्या प्रेरणेने संत मिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यास गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक भाविक जायखेडा येथे हजेरी लावतात. तसेच दरवर्षी पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर येथे जायखेडा येथून वारकºयांची पायी दिंडी काढण्यात येते. यामुळे जायखेडा ही उत्तर महाराष्ट्रातील वारकºयांची पंढरी मानली जाते. तसेच हिंदू-मुस्लिमांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाºया चांद शाहवली बाबांचा दर्गादेखील जायखेडा पोलीस ठाण्यात आहे. दरवर्षी बाबांचा उरूस भरविण्यात येतो.यानिमित्त मोठा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. याच ठिकाणी महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. या देवभूमीमुळे या गावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे गाव विकासाला आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून बागलाणमध्ये प्रथमच आमच्या जायखेडा गावाला मान मिळाला आहे. या दर्जामुळे रस्ता काँक्र ीटीकरणाची कामे केली जाणार आहेत. तसेच भाविकांच्या निवासाची सोय, नदीघाटची निर्मिती करून नदीपात्राचे सुशोभीकरण करून सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला जाईल.- यतिन पगार, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद
जिल्ह्यातील तीन तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 12:56 AM
सटाणा : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत राज्य निकष समितीने जिल्ह्यातील तीन गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात बागलाण तालुक्यातील जायखेडा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ठळक मुद्देसिन्नर, डुबेरेचा समावेशवारकºयांची पंढरी जायखेड्याचा होणार विकास