गोंदे दुमाला (जि नाशिक) :इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लियर सिटिंग कंपनी जवळ आज सकाळी पोलिसांच्या वाहनाला एका वाहनाने धड़क दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी पोलिसांचे वाहन नाशिक कडून इगतपुरी कड़े जात असताना हा अपघात घडला.
या अपघातात एका वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांचे चारचाकी वाहन बोलेरों गाड़ी क्र MH 12 PT-7716 राष्ट्रीय महामार्गा पलटी झाले. या अपघातात पोलिस कर्मचारी संतोष भगवान सौदाने वय 56, सचिन परमेश्वर सुकले वय43, रविंद्र नारायण चौधरी वय37 रा नाशिक हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थेची रुग्नवाहिका चालक निवृत्ती गुंड यांनी जखमी पोलिसांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करत मदत केली.
आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान पोलिस कर्मचारी आपल्या बोलेरो वाहनाने इगतपुरीच्या दिशेने आपल्या कामासाठी जात होते. याच वेळी येथील सॅमसोनाइट कंपनीच्या एका अधिका-याला घेवुन क्रेटा कार क्र MH 15 GR 5949 कंपनिकडे येत असताना पाठिमागुन भरधाव वेगाने येणारे एक अज्ञात चारचाकी वाहनाने क्रेटा कार ला जोरदार धड़क दिली त्यात क्रेटा कार जागेवर फिरून दुभाजकावर आढळले आणी पोलिसांच्या वाहनाला धड़कले. या झालेल्या अपघातात पोलिसांची बोलरो व क्रेटा ही दोन्ही वाहने पलटी होऊन भीषण अपघात घडला. मात्र ज्या वाहनाने धड़क दिली ते वाहन घेवुन चालक पसार झाला आहे. या वाहनाचा पोलिस कडून शोध घेत आहेत. वाडीव-हे पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.