नाशिक : चोरीच्या गुन्'ातील मुद्देमाल हस्तगत करूनही त्याची पोलीस दप्तरी नोंद न करणाऱ्या उपनगरच्या गुन्हे शोध पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केल्याचे खात्रिलायक वृत्त आहे़ भाऊराव गांगुर्डे, आरीफ सय्यद व प्रेमचंद गांगुर्डे अशी या तिघांची नावे आहेत़ याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका सोने चोरीच्या गुन्'ात उपनगर पोलिसांनी इराणी गुन्हेगारास अटक केली होती़ त्याने दिलेल्या कबुलीनुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी भाऊराव गांगुर्डे, आरीफ सय्यद व प्रेमचंद गांगुर्डे यांनी नाशिकरोड परिसरातल्या देवी चौकातील एका सराफाकडून एक तोळे सोने जप्त केले होते़ तसेच या सराफी व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयेही घेतले़ मात्र या मुद्देमालाची पोलीस दप्तरी कोणतीही नोंद केली नाही़ तसेच या सुवर्णकाराला आर्थिक त्रास दिला जात असल्यामुळे त्याने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली़ या तक्रारीनुसार पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण यांनी या प्रकरणाची चौकशी केली़ त्यामध्ये तथ्य असल्याचा अहवाल पोलीस आयुक्तांना दिल्यानंतर त्यांनी या तिघांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले़ या तिघांपैकी भाऊराव गांगुर्डे हे पूर्वी वाहतूक शाखेत, आरीफ सय्यद हे भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात, तर प्रेमचंद गांगुर्डे हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये कार्यरत होते़ (प्रतिनिधी)
उपनगर पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचे निलंबन चोरीचा माल हस्तगत, मात्र नोंदच नाही : गुन्हे शोध पथकातील कर्मचारी
By admin | Published: December 14, 2014 2:04 AM