ठळक मुद्देतालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ७९६ झाली
येवला : शहरासह तालुक्यातील तीन संशयितांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर सहा बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.बाधितांमध्ये येवला शहरातील गंगादरवाजा भागातील ४७ वर्षीय पुरूष, तालुक्यातील नगरसुल येथील ९७ वर्षीय वृध्दा, मुखेड येथील ६२ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. नाशिक रूग्णालयातून तीन तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून तीन असे एकूण सहा बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ७९६ झाली असून आजपर्यंत ६८८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ४६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ६२ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.