शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
3
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
4
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
5
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
6
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
7
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
8
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
9
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
10
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
11
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
12
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
13
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
15
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
16
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
17
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
18
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
19
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा

संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद : गुन्हे शाखेचा सापळा

By admin | Published: May 25, 2017 9:50 PM

या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.

संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजाराची रोकड लुटीच्या दरोड्यामधील तिघे संशयित फरार होते. या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून तीन इसम उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने सापळा रचला. दरम्यान, तीन संशयित इसम या भागात फिरताना आढळून आले. ते एका पल्सर दुचाकीवरून या भागात येऊन पिस्तूल खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या प्रतीक्षेत होते. याचवेळी पथकाला खात्री पटल्यानंतर तिघांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, मॅक्झीन व गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी या तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी महेश चिंधू ऊर्फ चिंतामण आंधळे (२३, रा. चेहेडी), महेश पांडुरंग लांडगे (२२, रा. वडगाव पिंगळा), सुमित अविनाश निरभवणे (२२, नाशिकरोड) यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी काही साथीदारांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे