सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. १५ फूट उंच साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीला कारने जोरदार धडक देत साईभक्तांना चिरडले. त्यात तीन साईभक्त ठार झाले असून, २२ साईभक्त गंभीर जखमी झाल्याचे समजते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिर्डीकडे साईनामाचा जप करीत चाललेली कांदिवली समतानगर येथील पालखी देवपूर फाट्याच्यापुढे असताना स्विफ्टकार (क्र मांक एम एच १५ सीटी ९१०१) या वाहनाने १५ फुटी देखावा असलेल्या रथाला जोरदार धडक दिली. त्यात तीन साईभक्त जागीच ठार झाले तर १९ साईभक्त गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होऊन अर्धातास झाल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहचले नसल्याने साईभक्तांनी संताप व्यक्त केला. काही जखमींना नाशिक येथे तर काहींना शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी व ठार झालेल्या साईभक्तांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तीन साईभक्त ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:15 AM