याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई येथील विलेपार्ले येथून शनिवारी (दि.२) संध्याकाळी सुमारे दहा ते पंधरा युवा साईभक्त दुचाकींवरून शिर्डी यात्रेसाठी रवाना झाले होते. या साईभक्तांनी कसारा घाटाच्या प्रारंभी एका हॉटेलमध्ये रात्रीचे भोजन केले आणि तेथून पुढे नाशिकमार्गे शिर्डीच्या दिशेने प्रवास सुरू केला. दरम्यान, गरवारे पॉइंट चौफुलीवरून दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलावरून द्वारकेकडे जाणे पसंत केले असता अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको लेखानगरजवळ रविवारी मध्यरात्री मुंबईकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीस्वार साईभक्तांच्या मोपेड दुचाकीला (एम.एच.०२ एफएच०६१०) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार साईभक्त वैजनाथ चव्हाण (२१), सिध्दार्थ भालेराव (२२), आशिष पाटोळे (१९) (सर्व राहणार, विलेपार्ले, मुंबई) हे तिघे खाली कोसळले. यावेळी ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघे गंभीरपणे जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, उपनिरीक्षक राकेश शेवाळे यांनी गस्ती पथकासह उड्डाणपुलावर धाव घेतली. तिघा साईभक्तांचे मृतदेह तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. या अपघातात जखमी झालेला आनिष वाकळे यास १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. फिर्यादी नीलेश धावडे याच्यासोबत त्याचा मित्र सिध्दार्थ भालेराव हे दोघे युनिकॉनवरून (एम.एच०२ एफ६१०) प्रवास करत होते. धावडे याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
फोटो आर वर ०३साई नावाने सेव्ह आहे.