शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

नगरच्या शार्पशूटरसह तिघे नाशकात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:40 AM

नाशिक : अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरुख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि़२२) पहाटे सापळा रचत पाथर्डी फाटा परिसरातून जेरबंद केले़ या तिघांकडून दोन विदेशी बनावटीची पिस्तूल, ...

नाशिक : अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरुख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि़२२) पहाटे सापळा रचत पाथर्डी फाटा परिसरातून जेरबंद केले़ या तिघांकडून दोन विदेशी बनावटीची पिस्तूल, ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे़ शहरात मोठे कांड करण्याचा कट या तिघांनी रचला होता, मात्र त्यांना वेळीच जेरबंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे़ दरम्यान, पाथर्डी फाटा परिसरात अतिरेकी पकडल्याचा संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर अतिरेकी नसून सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा पोलिसांनी केला़  पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील तसेच मोक्कातील सराईत गुन्हेगार शाहरुख रज्जाक शेख (२५, रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) व सागर सोना पगारे (२२, रा. चितळी, ता. राहता, जि. नगर) हे दोघेजण असल्याची माहिती अहमदनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याशी चर्चा केल्यानंतर रविवारी (दि़२२) पहाटेच्या ४ वाजेच्या सुमारास नाशिक शहर पोलीस व कमांडो यांनी इमारतीला वेढा घातला़  सराईत गुन्हेगार हे पार्वती अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावरील रमेश सावंत यांच्या फ्लॅट नंबर १३ मध्ये राहत असल्याचे समोर येताच काही पोलिसांनी इमारतीच्या जिन्यातून तर काही जणांनी शिडीचा वापर करून फ्लॅटच्या गॅलरीत प्रवेश केला़ पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करताच सराईत गुन्हेगार शाहरूख शेख व बारकू सुदाम अंभोरे (२१, रा. चितळी, ता. राहता, जि. अहमदनगर) या दोघांना झडप घालून जेरबंद केले़ यानंतर बेडरूममध्ये असलेल्या सागर पगारे यास पकडण्यासाठी दरवाजा तोडला असता पगारेने पोलिसांवर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वीच कमांडो पथकाने जिवाची पर्वा न करता झडप टाकून त्यास ताब्यात घेतले़पाथर्डी फाटा परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत पोलिसांची ही मोहीम सुरू होती. या मोहिमेमुळे पाथर्डी परिसरात अतिरेकी पकडल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते़ यामुळे स्थानिकांसह नागरिकांनी पार्वती अपार्टमेंटसमोर गर्दी केल्याने पोलिसांना बदोबस्तात वाढ करावी लागली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ़रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़  दरम्यान, हे सराईत गुन्हेगार शहरात कोणत्या उद्देशाने राहत होते, त्यांनी घरफोड्या वा गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे़ ऐन दिवाळीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरीअहमदनगर पोलिसांनी अटक केलेल्या शेखला न्यायालयात हजर करण्यासाठी नेले असता चहा पिण्याचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी देत तो फरार झाला़ याप्रकरणानंतर तीन पोलीस कर्मचाºयांना निलंबितही करण्यात आले़ यामुळे शेख पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते़ नाशिक व नगर पोलिसांनी संयुक्तपणे शेखच्या मुसक्या आवळल्या़फ्लॅटमालकावर होणार गुन्हा दाखलदहशतवाद विरोधी पथकाने काही वर्षांपूर्वी सातपूर परिसरातील दहशतवादी बिलाल यास अटक केली होती़ त्यानंतर घरमालकांना घर भाडेतत्त्वावर देताना त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक केले़ मात्र, या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे समोर आल्यानंतर अनेक घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते़ अहमदनगरच्या या तिघांना घर भाडेतत्त्वावर देणारे रमेश सावंत यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती का याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे माहिती पोलीस अधिकाºयांनी दिली आहे़विदेशी पिस्तूलसह काडतुसे जप्तगत वर्षभरापासून अहमदनगर पोलीस कुख्यात गुन्हेगार शेख व त्याच्या साथीदारांच्या मागावर होते़ त्यानुसार शेखसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन विदेशी पिस्तूल, ४० काडतुसे, चार मोबाइल व पासिंग न झालेली दुचाकी जप्त केली आहे़