शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

तीन घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:57 AM

आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़

नाशिक : आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़ अमर ऊर्फ अमित बळीराम लोमटे ( रा. रो-हाऊस नंबर ४३, लोकधारा सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. खासगी ठेकेदारीचे काम करणाऱ्या अमर लोमटे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़दुसरी घटना सातपूर येथील स्वारबाबानगरमध्ये शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़ धम्म चौकातील रहिवासी भीमराव शंकर उबाळे (३७, रा. वरीलप्रमाणे) यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, सापतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़तिसरी घटना पंचवटीतील फुलेनगरमध्ये घडली़ युवराज विजय बोराडे (२८, रा. फुलेनगर) या युवकाने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच त्याचे वडील विजय बोराडे यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.रेल्वेतून पडून कर्मचाºयाचा मृत्यूनाशिकरोड : सिमला येथे रेल्वेने जाणाºया साने गुरुजी शिक्षण संस्थेतील कर्मचारी केशव संगमनेरे (५३) यांचे रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जयभवानीरोड लवटे मळा येथील संगमनेरे हे आपल्या मित्रांसोबत सिमला येथील कुलू मनाली येथे फिरण्यासाठी रेल्वेने जात होते. गुरूवार (दि. १५) रात्री संगमनेरे हे रेल्वेतून पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे.शहरातून दोन दुचाकींची चोरीनाशिक : शहरातील आर्टिलरी सेंटर व कॉलेजरोड परिसरातून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर व पिंपळगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्णा सोसायटीतील रहिवासी अजय राजभर यांची दुचाकी (एचआर ०१, पी ८०५९) संशयित प्रवीण ऊर्फ चाफा निंबाजी काळे याने सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पाटीलनगरमधील रहिवासी सतीश कांबळे यांची दुचाकी (एमएच २०, सीएल १७४१ ) चोरट्यांनी कॉलेज रोडवरीलशोरूमच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी