शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

शेजवळ खून प्रकरण तिघा संशयितांना शिर्डीहून अटक

By admin | Published: January 25, 2017 12:33 AM

नियोजनबद्धरीत्या खुनाचा बदला : इतर फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू

नाशिक : जेलरोड परिसरातील सुरेंद्र सिद्धार्थ शेजवळ ऊर्फ घाऱ्या या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराच्या खून प्रकरणातील तिघा संशयितांना नाशिक पोलिसांनी मंगळवारी (दि़ २४) शिर्डीजवळील देर्डे फाट्यावर अटक केली़ दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असून, यामागे राजकीय कारण नसल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी दिली़  शुक्रवारी (दि़ २०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजवळ व त्याचा मित्र विक्र म पोरजे हे अ‍ॅक्टिवा दुचाकीने घरी जात होते़ संशयित अनिल सखाराम डिग्रसकर ऊर्फ बाळा (रा़ संजय गांधीनगर, जेलरोड), रामभाऊ किसन चव्हाण (रा़ संकल्प सोसायटी, कोणार्कनगर), राहुल देवराम गोतरणे (रा़ गुरुनमन रो हाउस, राजराजेश्वरीजवळ, जेलरोड) व त्यांचे साथीदार यांनी शेजवळ याच्यावर तलवार व कोयत्याने वार करून शेजवळचा खून केला व फरार झाले होते़ या खुनाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर शहरातील तिन्ही युनिट व नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी संशयितांच्या मागावर होते़ त्यातच नाशिकरोडच्या पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक प्रकाश आरोटे यांना गुन्ह्यातील इस्टीम कार व संशयित हे शिर्डी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर स्वतंत्र टीम तयार करण्यात आली़ सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, आरोटे, कॉन्स्टेबल वाटाणे व पथकाने शिर्डी परिसरात शोध घेऊन कारसह या तिघा संशयितांना अटक केली़