नाशिक : डे केअर सेंटर शाळेत गेल्या १८ वर्षांपासून कै. आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व बालकवी स्व.त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना स्पर्धा समर्पित जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गेल्या तीन वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीदेखील तालुका स्तरावर तालुक्यात जाऊन आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेसाठी कवींच्या नावाने गट तयार करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी एकनाथ आव्हाड होते. प्रास्ताविक सारिका पारखी यांनी केले. बक्षीस वितरणप्रसंगी अॅड. ल. जि. उगावकर, गोपाळ पाटील, अंजली पाटील, अनिल भंडारी, वसंत कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, डॉ. मुग्धा सापटणेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वाती किशोर पाचपांडे, अलका दराडे, जयश्री शिरीष कुलकर्णी, सोमनाथ पगार, वैजयंती श्रीकृष्ण सिन्नरकर, संजय दगू गोराडे, भावना कुलकर्णी, विलास पंचभाई, तनुजा सुरेश मुळे, तन्वी अमित, नेहा अनिरुद्ध गोसावी, अलका कुलकर्णी, लता मधुकर पवार, मधुरा गोरे, मनीषा नलगे यांनी केले.