नांदगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना साप्ताहिकात बातमी प्रसिद्ध करू, अशी धमकी देणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. या तिघा संशयित पत्रकारांविरु ध्द खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे व जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक विघे, प्रदीप चव्हाण, गणेश सोनवणे या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टर रोहन बोरसे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे वृत्त कळताच आज सांयकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात शहरातील डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तिघा संशयितांनी ग्रामीण रु ग्णालयात जावून तेथील डॉक्टर्स कर्मचाऱ्यांना बातमी प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली धमकावले यापूर्वी असेच प्रकार घडले असल्याने आज डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी पोलिसांत तक्र ार दाखल करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर बोरसे यांनी या घटनेची जिल्हा शल्यचिकित्सकांना फोनवरून माहिती दिली. वारंवार धमकावण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने आमची नांदगाव ग्रामीण रुग्णालयातून बदली करा अशी विनंती जिल्हा शल्य चिकित्सकांना करण्यात आली. यानंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी मग पोलीस स्टेशनला धाव घेतली व झालेल्या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अरु ण निकम यांना दिली. एव्हाना शहर व तालुक्यातील नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेऊन गर्दी केली. या कालावधीत संशयितांच्या कुटुंबातल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याप्रकरणी शनिवारी नांदगाव बंदची हाक देण्यात आली आहे. (वार्ताहर)
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकावणारे तिघे अटकेत
By admin | Published: March 04, 2017 1:03 AM