ठळक मुद्देवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला
वणी : शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आठ दिवसांत ५५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीस गेल्याने घराबाहेर दुचाकी लावणारे नागरिक धास्तावले आहेत.त्यात १५ हजार रुपये किमतीची (एमएच १५ सीएच ८५२०), १० हजार रुपये किमतीची हीरो होंडा कंपनीची (एमएच ४१ के ०९२४) तसेच ३० हजार रुपये किमतीची (एमएच १५ एफजी ४१६०) या दुचाकींचा समावेश आहे. दुचाकी लांबविणाऱ्या संशयितांविरोधात वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत करीत आहेत.