त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुळवड, खडकओहोळ, बेरवळ या तीन ग्रामपंचायतींमधील वळण, सावरपाडा, करंजपाणा, चौरापाडा, कडेगव्हाण व वाघचौडा ही पाड्याची ठिकाणे कोरोनापासून दूरच राहिली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील मार्चपासून ते या वर्षीच्या मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरोना कोविडच्या दोन लाटा आल्या, पण वरील तीन गावे व पाच पाडे कोविडच्या कचाट्यातून सही सलामत बचावली. तालुका तसा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण व दुर्गम भागात व जंगलाने वेढलेल्या दुर्गम भागात विखुरला आहे. त्र्यंबकेश्वर या मुख्यालयासह तालुक्यात १२५ गावे आहेत, पण तरीही तालुक्यात कोविडने जी १२० गावांपर्यंत कोरोनाने वेढा घेतला. खरशेत ग्रामपंचायत हद्दीतील व त्र्यंबक तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धावपटू कविता राऊत यांचे जन्म गाव खरशेतचा सावरपाडा. मुळवड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मुळवड, वळण, करंजपाणा, सावरपाडा, तसेच मुळवड ग्रा.पं. हद्दीत करंजपाणा, चौरापाडा, वळण, सावरपाडा, चौरापाडा ही महसुली गावे आहेत. मुळवड येथे तीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. मात्र, तीन पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले, तरी त्यांच्यात कुठलीही लक्षणे आढळली नाहीत आणि ते गृहविलगीकरणातच बरे झाले. या गावांमध्ये ग्रामविकास अधिकारी संजय एन.आहेर यांनी गावात लक्षपूर्वक सर्व नियमांची तंतोतंत अंमलबजावणी करून घेतली.
-----------------------
नियमांचे तंतोतंत पालन
पूर्ण घराला सॅनिटायझरची फवारणी, जंतुनाशक फवारणी, बीएचसी पावडर रस्त्यावर टाकणे, लोकांना मास्क लावून फिरण्याची सक्ती केली. वारंवार साबणाने हात धुणे, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जवळपास १० ते १२ वाड्या-पाड्यातील घरांमध्ये जंतुनाशक सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. कोणीही दुसऱ्या गावी जायचे नाही, अगर नातेवाइकांचे येणेही टाळले. गावात प्रा.आ.केंद्र असल्यामुळे आरोग्यसेवेचा पुरेपूर उपयोग करून घेतला. प्रामुख्याने तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी किरण जाधव, ग्रामविकास अधिकारी संजय एन. आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोतीलाल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.पाटोळे, सरपंच चंचला बळीराम बांगाड, उपसरपंच रोहिदास मुळा भोये, बळीराम झिपर, पोलीस पाटील गणपत जाणू चामडी, चौरापाडा या सर्वांच्या विशेष सहभागाने या महसुली आठ गावांपासून कोरोना दोन्हीही लाटेत चार हात दूर राहिला.