नाशिक : पंचशीलनगर परिसरात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचला असता तिघे संशयित चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खाकीचा हिसका दाखवताच तिघांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली देत दागिने ज्या सराफाकडे विकले त्याचा ठावठिकाणा सांगितला. पथकाने संशयित सराफालाही औरंगाबादरोडवरुन ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्याअधारे गंजमाळ येथील पंचशीलनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात सोनु ऊर्फ अरबाज रफिक बेग (वय २४), शहेबाज गुलामहुसेन शेख (२०) हे दोघे अडकले. त्यांची पाेलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी एका साथीदाराचे नाव उघड केले. यावरून पोलिसांनी बजरंगवाडी येथून तिसरा संशयित समीर हमीद शेख (२२) यास ताब्यात घेतले. या तिघांनी मिळून नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गेल्यावर्षी घरफोडी केल्याची कबुली दिली. या घरफोडीत लुटलेले दागिने चोरट्यांकडून घेणारा संशयित सराफ व्यावसायिक राजेंद्र बुधू सोनार (वय५२, रा. कपालेश्वरनगर, औरंगाबादरोड) यास बेड्या ठोकल्या. या चौघांना पुढील तपासाकरिता नाशिकरोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
चोरीचे सोने घेणाऱ्या सराफासह तिघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 1:34 AM
पंचशीलनगर परिसरात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचला असता तिघे संशयित चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खाकीचा हिसका दाखवताच तिघांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली देत दागिने ज्या सराफाकडे विकले त्याचा ठावठिकाणा सांगितला. पथकाने संशयित सराफालाही औरंगाबादरोडवरुन ताब्यात घेतले.
ठळक मुद्देघरफोडीचा गुन्हा उघड : पंचशीलनगरामध्ये रचला सापळा