शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 2:43 AM

गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्च वगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

नाशिक - गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्च वगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे ‘आर्थिक परिस्थिती : कमी गुंतवणूक, रोजगाराचा अभाव’ या विषयावर शनिवारी येथे चर्चासत्र झाले. चिदंबरम प्रमुख वक्ते होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण होते. खासदार कुमार केतकर आणि माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे उपस्थित होते.नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) या दोन बाबींनी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा दर कमी झाला आहे तसेच रोजगार निर्मिती पूर्णत: ठप्प झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलणे सर्वसामान्यांच्या हातात असल्याचे सांगून त्यासाठी आगामी निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. काळा पैसा बाहेर येण्याची व नोटाबंदीची जी उद्दिष्टे सांगितली गेली ती पूर्ण झाली नाही.काँग्रेसमुक्तीचा लाभ कोणाला ?काही साम्राज्यवादी देशांकडून भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्याचे कुमार केतकर यांनी सांगितले. काश्मीरबाबत सध्याचे धोरण राबविले गेल्यास तेथे अराजक येण्याची व त्यातूनच काश्मीर भारतापासून वेगळा होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. २०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणाचे काय होणार यापेक्षा देशाचे भवितव्य काय राहणार हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले.स्वातंत्र्याचा संकोच होतोय सध्या देशामध्ये उन्मादक सांस्कृतिक राष्टÑवाद फैलावत आहे. त्यातून न्यायसंस्थेसह विविध संवैधानिक संस्थांच्या स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचे अभय ठिपसे यांनी सांगितले. खोट्या इतिहासाचे उदात्तीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. देशामध्ये अघोषित सेन्सॉरशिप असल्याचे सांगत देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेस